भिवंडीतील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयाचे होणार अधुनिकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:06 PM2018-01-24T18:06:39+5:302018-01-24T18:09:24+5:30

शासनाच्या प्रॉपर्टी रजिस्टर बुकात इंदिरागांधी स्मृती रूग्णालयाच्या इमारतीची नोंद

Indiragandi Smriti Sub-District Hospital will be upgraded to modernization of Bhiwandi | भिवंडीतील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयाचे होणार अधुनिकीकरण

भिवंडीतील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयाचे होणार अधुनिकीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देनाममात्र भाड्याने हॉस्पिटलचे शासनाकडे ३० वर्षाकरीता हस्तांतरणडॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयांत न्यावे लागत होतेआयसीयूच्या सुविधेसह स्कॅनमशीन,डायलेसीस मशीन सारख्या विविध मोठ्या अत्याधुनिक मशीन लागणार

भिवंडी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रॉपर्टी रजिस्टर बुकात शहरातील इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांच्या इमारतीची नोंद झाल्याने इमारतीच्या नुतनीकरणासह अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे हॉस्पिटल काही महिन्यात रूग्णाच्या सोयीसाठी सज्ज होणार आहे.शासनाच्या निर्णयाने होणाºया अधुनिकीकरणाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.
शहरात भव्य बांधकाम असलेल्या पालिकेच्या स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांचे उद््घाटन सन १९८५ साली झाले. जकातीपासून मिळणाºया उत्पन्नामुळे श्रीमंत झालेल्या पालिकेने हे हॉस्पिटल चांगले चालविले होते. पंरतू शासनाने जकात बंद केल्याने हा सफेदहत्ती पोसता येणे अशक्य झाल्याने स्थानिक लोकप्रतिनीधींनी व पालिका प्रशासनाने नाममात्र भाड्याने हॉस्पिटलचे शासनाकडे ३० वर्षाकरीता हस्तांतरण केले. त्यामुळे शासनाने २०११साली या रुग्णालयांस उपजिल्ह्याचा दर्जा देऊन रूग्णांना सोयी देण्याचा प्रयत्न केला. परंतू रूग्णालयांत दररोजची ८००पेक्षा जास्त बाह्यरूग्ण व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयांत न्यावे लागत होते. त्यामुळे रूग्णांना येथेच उपचार व सुविधा मिळण्याच्या हेतूने शहरातील स्थानिक नागरिक व लोकप्रतिनीधींनी शासनाकडे पत्र व्यवहार सुरू केला. त्यास ‘लोकमत’ने वाचा फोडून शासनापुढे रूग्णालयांची बाजू मांडली. शासनाने त्याची दखल घेत रूग्णांच्या हितासाठी विशेष प्रयोजनाने इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांची इमारतीची नोंद शासनाच्या दप्तरी करण्यात पुढाकार घेतला. वास्तविक नाममात्र भाड्याच्या इमारतीवर शासननियमाप्रमाणे मान्यता मिळत नाही. परंतू लोकहितातून शासनाने हा निर्णय घेतल्याचे पत्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांच्या व्यवस्थापनाला पाठविले आहे.
मागील आठवड्यात अन्न विषबाधा झालेल्या मदरशामधील २८ विद्यार्थ्यांना मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. ही घटना ताजी असताना हे रूग्णालय शासनाच्या दप्तरी नोंद होऊन त्याचे अधुनिकीकरण होणार असल्याची बातमी मिळाल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या इमारतीमध्ये नवीन अत्याधुनिक मशीन लावण्यासाठी योग्य तो बदल करण्यात येणार असुन रूग्णांसाठी आयसीयूची देखील सुविधा होणार आहे.तसेच स्कॅनमशीन,डायलेसीस मशीन सारख्या विविध मोठ्या अत्याधुनिक मशीन येणार आहेत.तसेच डॉक्टरांच्या संख्येत व खाटांच्या संख्येत वाढ होणार असल्याने शक्यतोवर रूग्णांना मुंबईला पाठविण्याऐवजी या रूग्णालयांत उपचार मिळावेत अशी सोय उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी दिली.

Web Title: Indiragandi Smriti Sub-District Hospital will be upgraded to modernization of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.