लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पाकिस्तान कुवतीप्रमाणे भारताशी वागला नाही तर जगाच्या नकाशावरून नामाेनिशाण मिटविण्याची हिंमत भारतामध्ये आहे. भारत दहशतवादाविरुद्ध तडजाेड करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, दाेन्ही देशांच्या संमतीनेच शनिवारी रात्री शस्त्रसंधी जाहीर झाली हाेती. परंतु, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणेही पाकिस्तानची बेइमानी आहे. भारत मात्र आपल्या कमिटमेंटवर ठाम असताे. पाकच्या अशा कुरापती गृहीत धरूनच माेदींनी शस्त्रसंधीचे ट्विट केले नव्हते. परंतु, भारतीय वायुदल मजबूत आहे. पाक लष्कराने शनिवारी रात्री भारतीय नागरिकांवर जाे हल्ला केला, त्याला भारतीय लष्करानेही सडेताेड उत्तर दिले. आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी व्यवहार केला पाहिजे, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.