भारत पाक व मधेच बांग्लादेश अशीच त्या गावांची अवस्था
By Admin | Updated: July 7, 2015 23:58 IST2015-07-07T23:58:39+5:302015-07-07T23:58:39+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट

भारत पाक व मधेच बांग्लादेश अशीच त्या गावांची अवस्था
नेवाळी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट परिस्थिती बनली असून भारत, पाकिस्तान व मधेच बांगलादेश अशी असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर येथील कार्यालयात बोलताना व्यक्त केले. ते उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांच्या चर्चेत बोलत होते.
गावातील जमिनींवरील आरक्षणाविषयी बोलताना २५० एकर जमिनीवर डंपींगचे आरक्षण टाकून मोठा अन्याय केला आहे. यामुळे येथील भूमिपुत्र पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील नागरिकांची कल्याणच्या आधारवाडीसारखी अवस्था होईल., असे सांगून कार्यकर्त्यांनी या आरक्षणाला तीव्र विरोध केला. आपण सर्व एक व्हा, मतभेद विसरा, हरकती घ्या, आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही. आपला मतदार संघ माण नाही परंतु मी आपल्या पाठिशी उभा राहीन, असे कथोरे यांनी यावेळी सांगितले.