शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र महापालिकेसाठी बदलापूरवासी सरसावले

By admin | Updated: January 6, 2016 01:04 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या मोहीमेत ७,६५० नागरिकांनी स्वतंत्र महापालिकेला कौल दिला असून तशा आशयाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी ते निवेदन कोकण आयुक्त तानाजी संत्रे यांना सुपूर्द केले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका एकत्र करून त्यांची एकच महापालिका करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. त्याबाबत अभ्यासासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या स्वतंत्र महापालिका करायच्या असतील तर या समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. समितीची पहिली बैठक मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तेथील सर्व अधिकारी आणि कोकण आयुक्तांपर्यंत बदलापुरातील नागरिकांची मागणी पोचविण्यासाठी देशमुख यांनी नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र कोकण आयुक्तांकडे सुपूर्द केले. या वेळी स्वतंत्र महापालिका कशासाठी हवी, असा प्रश्न आयुक्तांनी विचारला. बदलापूरची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात असून वांगणीसह इतर ग्रामीण भाग बदलापूरला जोडल्यास बदलापूरची स्वतंत्र महापालिका होणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी बदलापूर शहराचा विकास आराखडा नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. स्वतंत्र महापालिकेचा निर्णय झाल्यास ते गृहीत धरून हा आराखडा तयार करता येईल, असे म्हणणे देशमुख यांनी मांडले. बदलापूर पालिकेची निवडणूक ही अवघ्या सात महिन्यांपूर्वी झाली असून लागलीच महापालिका करुन निवडणूका घेणे योग्य राहणार नाही असेही स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले. जिल्हा सदस्य सेवक देशमुख, शहर उपाध्यक्ष संजय कराळे, दिनेश धुमाळ, सचिव अविनाश देशमुख आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.