उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By सदानंद नाईक | Published: August 15, 2023 04:07 PM2023-08-15T16:07:57+5:302023-08-15T16:08:31+5:30

उल्हासनगर महापालिका प्रांगणात देशकच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले.

Independence Day celebrated with enthusiasm in Ulhasnagar | उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिका प्रांगणात आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, दिपक जाधव यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

 उल्हासनगर महापालिका प्रांगणात देशकच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांच्यासह महापालिका अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक आदीजन उपस्थित होते. तसेच प्रांत कार्यालय प्रांगणात प्रांत अधिकारी विजयनंद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, सहायक पोलिस अनिल कोळी, महेश सुखरामनी यांच्यासह नागरिक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त कार्यालय प्रांगणात पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या हस्ते झाले, मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शहरातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, विविध राजकीय पक्षाचे कार्यालय, शाळा, महाविद्यालयात मोठ्या उत्सवात ध्वजारोहण झाले. तसेच रिजेन्सी-अंटेलिया येथे २ की.मी. लांबीचा ध्वज फडकविण्यात आला आहे.
 

Web Title: Independence Day celebrated with enthusiasm in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.