शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

पाणी वाढले, बिल वाढले; नागरिकांमध्ये मात्र संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे.

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे. पाणी दरवाढीला १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली असुन त्याची अंमलबजावणी यंदाच्या एप्रिलपासून होणार आहे. त्यापुर्वीच बिलाची रक्कम अचानक वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत.

पालिकेकडुन २०१४ पर्यंत  पाणीपुरवठ्याच्या निवासी व व्यावसायिक वापरासाठी प्रती १ हजार लीटरसाठी अनुक्रमे ७ रुपये व २८ रुपये दर वसुल केला जात होता. गेल्या १० वर्षांत पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने त्याच्या दरवाढीचा प्रस्ताव २०१५ मधील स्थायीत सादर केला होता. स्थायीने त्याला मान्यता दिल्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजीच्या महासभेने निवासी दरात ३ रुपये व वाणिज्य दरात १२ रुपये दरवाढीला मान्यता दिली. त्यामुळे सध्या प्रती १ हजार लीटर पाणीपुरवठ्यामागे निवासी वापरासाठी १० रुपये तर व्यावसायिक वापरासाठी ४० रुपये दर पालिकेकडुन वसुल केला जात आहे. या दरवाढीला किमान ३ वर्षे पुर्ण होत नाही तोवर पुन्हा १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समितीने निवासी दरात २ रुपये व व्यावसायिक दरात १० रुपयांच्या दरवाढीस  मान्यता दिली. गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीत केलेली हि दरवाढ जवळपास दुप्पट ठरणार असतानाच पालिकेला दोन वर्षांपुर्वीच्या १२६ एलएलडी पाणीपुरवठ्यात ५० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा उपलब्ध होऊ लागला आहे. पालिकेला एमआयडीसी कोट्यातून मंजुर झालेल्या ७५ एमएलडीपैकी २०१५ मध्ये २० तर ३० एप्रिल २०१७ पासून ३० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरीकांच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठा येत्या एप्रिलमध्ये सुरु होण्याची शक्यता प्रशासनाकडुन वर्तविली जात आहे. शहरात निवासी नळजोडण्यांची संख्या ३४ हजार १९४ व व्यावसायिक नळजोडण्यांची संख्या २ हजार ७७० इतकी आहे. तर काही ठिकाणी बेकायदेशीर नळजोडण्या दिल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये उजेडात आल्याने त्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिणामी वाढलेल्या अतिरीक्त पाण्यामुळे पाण्याची बिले अचानकपणे भरमसाठ वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत. वास्तविक पाणी २०१५ पासून वाढले असले तरी बिलात त्यावेळी झालेल्या दरवाढीखेरीज गतवर्षीच्या सप्टेंबर २०१७ पर्यंत पाण्याची बिले १० रुपये दरानेच वसुल करण्यात येत होती. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या बिलांचे नुकतेच वाटप करण्यात आले असता त्यात अचानक ४० ते ५० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक चक्रावून गेले आहेत. स्थायीने यंदा पाणीपट्टीत प्रती १ हजार लीटरमागे केलेली २ रुपयांची दरवाढ एप्रिल २०१८ पासून लागू केली जाणार असतानाही पाण्याच्या बिलांतील रक्कम कशी काय वाढली, असा प्रश्न नागरीकांसमोर उपस्थित झाला आहे. या वाढीव बिलांचे गौडबंगाल बेकायदेशीर नळजोडण्यांमध्ये असुन बेकायदेशीरपणे होणाय््राा पाणीपुरवठ्याचे शुल्क अधिकृत नळजोडण्यांद्वारे होणाय््राा पाणीपुरवठ्यात समायोजित केले जाते कि काय, असा संशय देखील व्यक्त होऊ लागला आहे. 

अतिरीक्त पाणीपुरवठा वाढल्याने नागरीकांना करण्यात येणाय््राा पाणीपुरवठ्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. परिणामी नागरीकांकडुन पाण्याचा वापर जास्त होऊ लागल्यानेच बिलांतील शुल्क वाढले आहे. 

-  पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे 

वाढलेला अतिरीक्त पाणीपुरवठा पालिकेला २०१५ व एप्रिल २०१७ पासून मिळत असताना पालिकेने त्यावेळपासुन नागरीकांना कमी पाणी दिले होते का? त्यावेळी व आत्ता आम्हाला पाणी तेवढेच मिळत असताना अचानक सप्टेंबरमध्येच पाणी कसे काय वाढले? नागरीकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांतील रक्कम बेकायदेशीर पाणीपुरवठ्यातील तफावतीला दूर करण्यासाठीच केला जात असुन त्याची चौकशी व्हावी. 

-  माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया 

टॅग्स :WaterपाणीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक