शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गणेशभक्तांमध्ये वाढली पर्यावरणविषयक जागरूकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 04:00 IST

गणेश घाटांवर दोन टन कचरा जमा, गणेश मंदिराच्या प्रकल्पात होणार खतनिर्मिती

डोंबिवली : पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली येथील गणेश घाटावर सोमवारी पाच दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. या वेळी भाविकांनी जमा केलेल्या निर्माल्यातून दोन टन कचरा गोळा करण्यात आला. खत तयार करण्यासाठी हा कचरा गणेश मंदिर संस्थानातर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पाकडे सुपुर्द केला जाणार आहे.गणेश घाटाचा विकास शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तेथे जेटी, हायमास्ट दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सध्या तेथे मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे काम सुरू आहे. गणेश घाटाकडे जाताना अडचण येऊ नये, यासाठी भक्तांसाठी व्यवस्था केली आहे. पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते तेथे निर्माल्य गोळा करतात. त्यातून प्लास्टिक आणि कचरा वेगळा केला जातो. पेंढरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचाही त्यासाठी मदत करतात. अनंत चतुदर्शीपर्यंत हे काम चालणार आहे. आतापर्यंत दोन टन कचरा जमा झाला आहे. भक्तांनीही हा कचरा जमा केल्याने त्यांच्यात पर्यावरणविषयक जागरूकता वाढत असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले.कुंभारखान पाड्यातील गणेशघाट विकसित करण्यासाठी भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सरकारकडून तीन कोटींचा निधी केला. तेथेही जेटी बांधली आहे. तर, जॉगिंग ट्रकचे काम सुरू आहे. या घाटावर सोमवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंडळाचे कार्यकर्ते निर्माल्य गोळा करून विघटित करण्याचे काम करत होते. एक ट्रकभर कचरा तेथे जमा झाला. कचºयापासून खत तयार करणाºया संस्थेला हा कचरा दिला जाणार आहे, असे मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप सावंत यांनी सांगितले.दरम्यान, गणेश भक्तांना म्हात्रे यांच्यातर्फे मानाचे श्रीफळ देण्यात आले.शाडूच्या मूर्तींचे घरीच विसर्जन, एमआयडीसी निवासी विभागातील नागरिकांचा पुढाकारडोंबिवली : उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखा, असे आवाहन सरकारी यंत्रणा तसेच पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे. मिलापनगरमधील ४५ रहिवाशांनी शाडूच्या गणपती मूर्तींचे विसर्जन घरोघरी करत पर्यावरण रक्षणाचा संदश दिला.कल्याणमध्ये २७ तर डोंबिवलीत ३७ विसर्जनस्थळ आहेत. परंतु, जलप्रदूषण टाळण्यासाठी कल्याण पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी तर, डोंबिवली पूर्वेतील पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्या नगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र येथे कृत्रिम तलाव बांधले आहेत.डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाच्या धर्तीवर प्लास्टिकची मोठी पिंपे ठेवली आहेत. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगरमधील रहिवाशांनी घरातील पिंपांमध्ये तसेच मोठ्या बादलीमध्ये सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले.मूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घातले. तर राहिलेली माती मूर्तिकारांना दिली. विसर्जनाच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthaneठाणे