Increase in the number of coronavirus patients in Thane district; 746 patients died during the day | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्य्या रुग्ण संख्येत वाढ; दिवसभरात ७४६ रुग्ण, तिघांचा मृत्यू 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्य्या रुग्ण संख्येत वाढ; दिवसभरात ७४६ रुग्ण, तिघांचा मृत्यू 

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.  शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६९ हजार ६५ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९९ झाली आहे.  
 
ठाणे शहरात २२०  रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ४९६ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०० झाली. कल्याण - डोंबिवलीत २१० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६४ हजार ३८६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०७  मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९५७ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३१ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ४३५ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार १२५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ६७३ आणि आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

Web Title: Increase in the number of coronavirus patients in Thane district; 746 patients died during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.