शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ; वकिलांचाही वकीलपत्र घेण्यास नकार

By पंकज पाटील | Updated: August 21, 2024 14:16 IST

कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे...

बदलापूर : बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी आज कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेंचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचे कळत आहे. 

कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. आरोपीला न्यायालयात आणण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी ही दक्षता बाळगली होती.

आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण -बदलापूरमधील या संतापजनक घटनेनंतर, बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केलं रास्ता रोको केला. त्यानंतर आता आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. 

कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

टॅग्स :badlapurबदलापूरCourtन्यायालयPoliceपोलिसStudentविद्यार्थी