ठाणे जिल्ह्यात २४ तासात १३३ कोरोना रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:37 IST2021-08-16T19:35:19+5:302021-08-16T19:37:42+5:30
ठाण्यात ४१ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला आहे. (An increase of 133 corona patients in 24 hours in Thane district)

ठाणे जिल्ह्यात २४ तासात १३३ कोरोना रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू
ठाणे: जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३३ कोरोना रुग्णांची वाढ सोमवारी झाली. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात ४१ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला आहे. (An increase of 133 corona patients in 24 hours in Thane district, four deaths)
कल्याण-डोंबिवलीत २४ नवे रुग्ण समोर आले आहेत. उल्हासनगरमध्ये चार नवे रुग्ण समोर आले आहेत. भिवंडी परिसरात रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला १६ रुग्णांची वाढ झाली. अंबरनाला सहा नवे रुग्ण आढळले आहेत. बदलापूरमध्येही ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यातील गांवपाड्यात चार नवे रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही.