भिवंडीत श्रीदेवी ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 22:02 IST2024-05-24T22:02:32+5:302024-05-24T22:02:45+5:30

भिवंडी शहरात दोन ठिकाणी त्यासोबत डोंबिवली व मुंबई या ठिकाणी ज्वेलर्स पेढी आहेत.

 Income Tax Department raids Sridevi Jewelers in Bhiwandi |  भिवंडीत श्रीदेवी ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा

 भिवंडीत श्रीदेवी ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा

नितीन पंडित, भिवंडी: शहरातील सुप्रसिद्ध श्रीदेवी ज्वेलर्स पेढी वर आयकर विभागाने शुक्रवारी सकाळ पासून छापा कारवाई केली आहे.प्रकाश तेजावत रमेश तेजावत यांच्या मालकीच्या श्रीदेवी ज्वेलर्स च्या भिवंडी शहरात दोन ठिकाणी त्यासोबत डोंबिवली व मुंबई या ठिकाणी ज्वेलर्स पेढी आहेत.

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील दुकानांवर सकाळपासूनच आयकर विभागाने कारवाई केली आहे.नक्की कोणत्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका त्यांच्या वर आहे याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. त्यासोबतच भिवंडी बाजार पेठेतील दुकानंवर डोंबिवली व मुंबई येथील पेढी वर सुध्दा कारवाई सुरू असल्याचे समजते.ही कारवाई अजून काही तास सुरू राहू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title:  Income Tax Department raids Sridevi Jewelers in Bhiwandi