शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

रिक्षाचालकाला मारहाण करणा-या चौकडीला अटक, कासारवडवलीनाका येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:37 AM

ठाणे : घोडबंदर रोडवर व्यवस्थित कार चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मुंबईतील एका चौकडीने ठाण्यातील रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना कासारवडवलीनाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी चौकडीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.विजय गरेल (३५) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते शुक्रवारी सायंकाळी हावरे सिटी येथून कासारवडवलीनाका ...

ठाणे : घोडबंदर रोडवर व्यवस्थित कार चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मुंबईतील एका चौकडीने ठाण्यातील रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना कासारवडवलीनाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी चौकडीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.विजय गरेल (३५) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते शुक्रवारी सायंकाळी हावरे सिटी येथून कासारवडवलीनाका येथे जात होते. याचदरम्यान, त्यांची रिक्षा प्लॅटिनम रोझा गार्डन येथे आल्यावर त्यांच्यासमोर आलेल्या कारचा चालक संजीलकुमार कोनार हा कार वेडीवाकडी चालवत होता. त्यामुळे विजयना रिक्षा चालवण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी कार व्यवस्थित चालवण्यास सांगितले. याचाच राग मनात धरू न त्या चौकडीने रिक्षासमोर कार उभी केली. तसेच चालक संजीलकुमार (३०) याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडली. तर, भावेश मरिअप्पण (२१) आणि अरविंद सिघामनी (२१) यांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच संजीलकुमार याने रोडवरील दगड डोक्यात टाकून विजय यांना दुखापत केली.या प्रकरणी तिघांसह महेंद्र नाडर (२०) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री त्यांना अटक केली. तसेच ते चौघे मुंबईतील धारावी परिसरात राहणारे असल्याचीमाहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.