उल्हासनगरात मध्यरात्री टोळक्यांचा तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 1, 2024 18:19 IST2024-04-01T18:19:06+5:302024-04-01T18:19:16+5:30
हल्ल्यात चिद्दी वैधसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरात मध्यरात्री टोळक्यांचा तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला, गुन्हा दाखल
उल्हासनगर : शहाड फाटक येथील वाल्मिकीनगर येथे तिघांवर एका ८ तें १० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला. हल्ल्यात चिद्दी वैधसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड फाटक वाल्मिकीनगर येथून चिद्दी वैध, साहिल वैध व विनोद वैध रविवारी रात्री जात होते. त्यावेळी एका ८ ते १० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले असून चिद्दी वैध यांची तब्येत गंभीर आहे. तिघांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हल्ला करणाऱ्या टोळक्यांच्या मागावर पोलीस असून हल्लेखोर लवकरच जेरबंद होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले. जुन्या वादातून हल्ला झाल्याचे बोलले जात आहेत.