ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बाेटांवर शस्त्रक्रीया!

By सुरेश लोखंडे | Updated: December 1, 2024 17:26 IST2024-12-01T17:26:38+5:302024-12-01T17:26:54+5:30

ठाणे शहरात अत्यंत महत्वाचे म्हणून ओळख असलेले सिव्हील रूग्णालय दीड वर्षांपासून येथील वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर स्थलांतर करण्यात आले.

In Thane Civil, 100 children underwent surgery for hernias, eyes, blood clots, and adhesions on a single day! | ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बाेटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बाेटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे: महागड्या रूग्णालयत लाखाे रूपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते. पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हील रुग्णालय गाेठत आहेत. यानुसार या रविवारीदेखील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शुन्य ते १८ वयोगटातील १०० मुला, मुलींच्या डोळ्यांची, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ आदीं शस्त्रक्रीय यशस्वीरित्या या एकाच दिवशी करण्याचा विक्रम ठाणे सिव्हील रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलाश पवार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी डाॅक्टरांनी केला आहे.

ठाणे शहरात अत्यंत महत्वाचे म्हणून ओळख असलेले सिव्हील रूग्णालय दीड वर्षांपासून येथील वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर स्थलांतर करण्यात आले. मात्र, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया ही केल्या जात आहेत. मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

            बालकांच्या या नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन पालक सिव्हील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली. के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला, मुलींच्या हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ, हायड्रोसील, फायमोसिस, चिकटलेली बोट, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया ठाणे सिव्हील रूग्णालयात पार पडल्या आहेत. यासाठी सायन रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी सिव्हील रुग्णालयात लहान मुला, मुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी काही जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडल्या असून, दुर्बिणीद्वारे देखील बहुतांशी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सिव्हील रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून, मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत असतात. डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

ठाणे सिव्हील रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे केवळ ऐकून होतो. मात्र आज प्रत्यक्ष अनुभवलं आहे. एकाच दिवशी एवढ्या मुलांवर शस्त्रक्रिया बघण्याची पहिलीच वेळ आहे. सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर सर्वांनी सिव्हील रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत.
प्रमिला जाधव, रुग्णाचे नातेवाईक, कल्याण

Web Title: In Thane Civil, 100 children underwent surgery for hernias, eyes, blood clots, and adhesions on a single day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे