माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 07:00 IST2025-02-13T07:00:02+5:302025-02-13T07:00:56+5:30
माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.

माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका
मीरा रोड - मीरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासह पालिकेतील उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
मीरा-भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आले होते. एकनाथ शिंदे व तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्याशी त्यांची तशी जुनी मैत्री मानली जाते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते काही काळ तटस्थ होते. भाईंदरच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेविका हेलन गोविंद यांचे माजी नगरसेवक पती जॉर्जी गोविंद यांच्यासह मच्छीमार नेते, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
🗓 १२ फेब्रुवारी २०२५ | 📍मीरा भाईंदर
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) February 12, 2025
माजी आमदार श्री. गिल्बर्ट मेंडोसा, माजी नगरसेविका सौ. शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक श्री. बर्नाड डिमेलो आणि माजी नगरसेवक श्री. गोविंद जॉर्जी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या मान्यवरांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखी बळकट झाली… pic.twitter.com/0aVv8eXEQw