भिवंडीतील धामणगाव वडपे चिंचवली रस्त्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण
By नितीन पंडित | Updated: July 9, 2024 17:32 IST2024-07-09T17:31:17+5:302024-07-09T17:32:05+5:30
नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हनुमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.

भिवंडीतील धामणगाव वडपे चिंचवली रस्त्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण
नितीन पंडित, भिवंडी: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या संरक्षणासाठी जांबोळी जल विभागाअंर्तगत असणाऱ्या भिवंडी तालुक्यातील धामणगाव वडपे चिंचवली या स्त्यावरील चिंचवली खालींग चौकी जवळ रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी व विद्यार्थी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हनुमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.
या रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या शाळकरी मुलांच्या हस्ते या खड्डेमय झालेल्या रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या आठवडा भरात या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा हनुमान पाटील यांनी दिला आहे.