भिवंडीत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक
By नितीन पंडित | Updated: May 13, 2023 16:50 IST2023-05-13T16:49:42+5:302023-05-13T16:50:09+5:30
सुरज कुमार राघवेंद्र सिंह वय २० वर्ष रा. तळोजा एमआयडीसी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भिवंडीत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला अटक
भिवंडी: गावठी कट्टा व जिवंत काढतोच बाळगणाऱ्या एका शांतीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. सुरज कुमार राघवेंद्र सिंह वय २० वर्ष रा. तळोजा एमआयडीसी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तो भिवंडी कल्याण रस्त्यावरील साई प्रेम धाब्याच्या समोर ६१५० रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन आला असता शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई नरसिंह सुदाम क्षीरसागर यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे करीत आहेत.