भिवंडीत अटकेच्या भीतीने पोलीस ठाण्यातच गुन्हेगाराचा विषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
By नितीन पंडित | Updated: December 29, 2023 18:53 IST2023-12-29T18:53:48+5:302023-12-29T18:53:52+5:30
याप्रकरणी आरोपीवर नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत अटकेच्या भीतीने पोलीस ठाण्यातच गुन्हेगाराचा विषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
भिवंडी: फसवणूक गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने अटकेच्या भीतीने पोलीस ठाण्यातच विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार नारपोली पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी आरोपीवर नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल मुरालीलाल गुप्ता वय ३६ वर्ष रा.काल्हेर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.अनिलवर दिंडोशी आणि वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे नारपोली पोलीस चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्याची उकळ करून त्यास अटक करतील या भीतीने त्याने पोनि प्रमोद कुंभार यांच्या दालनातील बाथरूममध्ये पोलिसांची नजर चूकवून बुधवारी सल्फोस ह्या कीटकनाशक गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अनिलच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पोऊनि रोहन देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि प्रमोद कुंभार करीत आहेत.