शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्यास त्वरित अटक करा

By admin | Updated: January 28, 2017 02:40 IST

पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी

मीरा रोड : पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आरोपीला दोन दिवसांत अटक करा, अन्यथा मोर्चा काढू, असा इशारा स्थानिक नगरसेवकांसह रहिवासी शिष्टमंडळाने काशिमीरा पोलिसांना दिला आहे. सातवीत शिकणारी १४ वर्षांची मुलगी जवळच्या पालिका स्वच्छतागृहात गेली असता तेथे एका अनोळखी तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. एक महिला शौचास गेली असता तिला ही मुलगी अर्धबेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. दिवसाढवळ्या पालिकेच्या स्वच्छतागृहात घडलेल्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अनुषंगाने स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे, नगरसेविका अनिता पाटील, मंदाकिनी गावंड, माजी नगरसेवक आत्माराम गावंड, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक स्नेहल सावंत, वैशाली खराडे, डोना देसाई, शिल्पा सावंत, प्रमिला लाडे, सुरेश सावंत, लक्ष्मण कांदळगावकर यांच्यासह मुलीचे नातेवाईक तसेच महिलांनी काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांची भेट घेऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)