उघड्या मॅनहोलवर तातडीने झाकण बसवा : ठामपा आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:52 IST2019-07-15T00:52:00+5:302019-07-15T00:52:08+5:30
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशी घटना ठाण्यात घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणेला शहरात कुठे मॅनहोल उघडे आहेत का?

उघड्या मॅनहोलवर तातडीने झाकण बसवा : ठामपा आयुक्तांचे आदेश
ठाणे : मुंबईत दोन वर्षांचा मुलगा गटाराच्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशी घटना ठाण्यात घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणेला शहरात कुठे मॅनहोल उघडे आहेत का? याचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने झाकण बसवण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या हद्दीत १३४ किमीचे एकूण ३०६ नाले आहेत. यापैकी १३ प्रमुख नाले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रात ३१ किमीचे ९२, नौपाड्यात साडेचार किमीचे २४, कळव्यात ९ किमीचे ४७, रायलादेवीत १७ किमीचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किमीचे २५, मानपाड्यात १७ किमीचे २६, वागळे इस्टेटमध्ये ८ किमीचे २४, उथळसरमध्ये साडेसात किमीचे २४ आणि कोपरीत ४ किमी लांबीचे ११ नाले आहेत. त्यातच मध्यंतरी शहरातील अनेक मॅनहोलची लोखंडी झाकणे गर्दुल्ल्यांनी चोरून नेल्याचे प्रकार समोर आले होते. हे प्रकार वाढू लागल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने अशाप्रकारे कुठेकुठे झाकणे नाहीत, कुठे ती तुटली आहेत, त्या ठिकाणांचा शोध घेऊन ती बसवण्यास महापालिकेने सुरुवात केल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.