शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा ठाण्यातून हस्तगत, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:10 IST

कफ सिरपचा साठा बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या जोगेश्वरी येथील एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देआरोपी जोगेश्वरीचा रहिवासी३ लाखाचा मुद्देमाल हस्तगतठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री हस्तगत केला. याप्रकरणी जोगेश्वरी येथील एका रहिवाशास अटक करण्यात आली आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इटरनिटी मॉलजवळ एका कारमधून कफ सिरपचा साठा येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ला सोमवारी रात्री मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या पथकाने इटरनिटी मॉलजवळ सापळा रचला. रात्री ९ वाजताच्या सुमारास या पथकास पोपटी रंगाच्या एका कारवर संशय आला. पोलिसांनी ही कार थांबवून पाहणी केली असता खाकी रंगाच्या एका बॉक्समध्ये आर.सी. कफ सिरपच्या १४४ बॉटल्स आढळल्या. हा साठा जोगेश्वरी येथील श्रवण रूपाराम चौधरी याच्या ताब्यात होता. पोलिसांनी विचारपूस केली असता औषध बाळगण्याचा त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. नशेसाठी या औषधाची विक्री होत असून, आरोपीने त्यासाठीच हा साठा बेकायदेशीरपणे मिळवला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून औषधाचा साठा, मोबाईल फोन आणि औषधाच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ३ लाख १७ हजार ६८0 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हाmedicinesऔषधं