शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 00:46 IST

शर्मा यांचा दणका; जयस्वाल यांनी बढती दिलेले अधिकारी मूळ पदावर

ठाणे : रीतसर प्रक्रिया पूर्ण न करताच पदोन्नती दिलेल्या ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी धक्का दिला आहे. नगर अभियंत्यांपासून इतर १९ अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना त्यांच्या मूळ पदावर आणले आहे. आकृतिबंधानुसार ही कार्यवाही केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती.महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, शहरविकास आणि पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता यांना वरच्या पदाची खैरात आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात वाटली होती. आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत मंजूर जागा नसतानाही केवळ संबंधित अधिकाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्याकडे वरिष्ठ पदाचा कार्यभार दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात नगर अभियंता असलेले रवींद्र खडताळे यांना पुन्हा उपनगर अभियंता या पदावर आणले. परंतु त्यांच्याकडे नगर अभियंतापदाचा प्रभारी पदभार तसाच ठेवला आहे. अर्जुन अहिरे यांच्याकडे उपनगर अभियंतापद असताना त्यांना अतिरिक्त नगर अभियंतापदाचा कार्यभार दिला होता. आता त्यांच्याकडे प्रभारी अतिरिक्त नगर अभियंतापद दिले आहे. भरत भिवापूरकर, विकास ढोले, नितीन पवार, धनंजय गोसावी, रामकृष्ण कोल्हे, रामदास शिंदे, नितीन येसुगडे आणि शैलेंद्र बेंडाळे या कार्यकारी अभियंत्यांकडे उपनगर अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता, तो काढून त्यांना पुन्हा कार्यकारी अभियंतापदावर आणले आहे.         शशिकांत साळुंखे, दत्तात्रेय शिंदे आणि अतुल कुलकर्णी या उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार होता, तो काढून त्यांना पुन्हा मूळ पदावर पाठवले आहे. कनिष्ठ अभियंता असलेले सुनील जाधव, सुनील निकुंभ, मनीष भावसार, संदीप गायकवाड आणि प्रशांत कलगुटकर यांच्याकडे उपअभियंतापदाचा कार्यभार दिला होता. त्यांना पुन्हा कनिष्ठ अभियंतापदावर आणले आहे. या कार्यवाहीमुळे नाराज झालेल्या अधिकाऱ्यांकडून काम करुन घेण्याचे कसब आता प्रशासनाला दाखवावे लागणार आहे.पदवीधर आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये वाद महापालिकेत पदवीधर आणि पदविकाधारक अभियंत्यांमध्ये अनेक दिवस वाद सुरू आहे. पदविकाधारक अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पदाची खैरात केली होती. त्याची दखल घेऊन शर्मा यांनी त्यांना पदावनत करून झटका दिला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका