ठाणे : राज्य राखीव पोलीस बलाची जिल्हा बदली 15 वर्षा ऐवजी 10 वर्ष करावी यासाठी गेल्या 20 दिवसांपासून समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी घरातच उपोषण सुरू केलं होते. या आंदोलनाची सुरुवात मार्च 2019 पासून केली असून या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयाबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी मुंडन आंदोलन देखील केलं आहे.
समाजसेविका अश्विनी केंद्रे या किडनी विकाराने ग्रस्त असून आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज त्यांची प्रकृती गंभीर झाली असून श्वास घेण्यास त्रास होत होता यावेळी मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या घरात येऊन त्यांना थेट कळवा येथील छत्रपती शिवाजीमहाराज रुग्णालयात हलवले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनि मज्जाव केला असून जर माज्या जीवितास काही झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील, असे आंदोलन कर्त्या अश्विनी केंद्रे यांनी सांगितले.
2 फेब्रुवारी रोजी विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यानी बैठक आयोजित केली होती.या बैठकीस समाजसेवक अमोल केंद्रे , SRPF च्या ADG मॅडम अर्चना त्यागी व विधान सभा अध्यक्ष यांच्यात जिल्हा बदली 10 वर्ष करण्यासाठी चर्चा झाली.विधान सभा अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी आम्ही लवकर 100% मार्ग काढून निर्णय देवू असे सांगितले.परंतु जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असे सांगितले.
समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे यांनी. 1 डिसेंबर रोजी मंत्रालय येथे मोर्चा आयोजित केला परंतु 9 जणांना अटक केली त्यानंतर सुटल्यावर मुंडण करून सरकारचा निषेध केला होता.