शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; मनसेने आयुक्तांना सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 00:03 IST

मीरा-भाईंदर पालिकेत युतीची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मीरा रोड : मीरा- भाईंदर पालिकेकडून काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या देखभाल, सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष करून त्यांचा अवमान केला जात असल्याचा मनसेने निषेध करत आयुक्तांना खडे बोल सुनावले.स्वत:ची दालने नागरिकांच्या पैशांमधून आलिशान सजवणारे महापालिका प्रशासन महापौर, उपमहापौर आदी पदाधिकाऱ्यांना मात्र काशिमीरा येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या देखभालीत स्वारस्य नाही. पुतळ्याची नियमित सफाई केली जात नाही. सणासुदीला रोषणाई, सजावट केली जात नाही. रात्रीचे अनेकवेळा दिवे बंद असल्याने पुतळा अंधारात असतो.

आजूबाजूला पानबिड्यांचे बाकडे, बार असल्याने मद्यपी, व्यसनींचा राबता असतो. पुतळ्याच्या चौकात दारुच्या बाटल्या, सिगारेटची थोटकं आदी पडलेली असतात. परंतु महापालिका मात्र सातत्याने डोळेझाक करुन महाराजांचा अवमान आणि विटंबना करत असल्याचा संताप मनसैनिकांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांच्यासह प्रकाश शेलार, नितीन बोंबले पाटील, विजय भगत, स्वराज कासुर्डे, महेश शिंदे, गणेश बामणे, ऋ षिकेश नलावडे, बाबूजी, सचिन शेडगे, शेरा पुरोहित, संकेत आर्डे, प्रकाश निकम, उदय सातार्डेकर, सचिन धनावडे, सचिन बोंबले- पाटील, नितीन मोहिते, सूर्या पवार, स्वप्नील गुरव, भावेश करवळ, अजय मुळे, साहिल उघडे, कुणाल करांडे, वैभव कासारे, अक्षय रकवी आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी पालिका मुख्यालयात आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. आयुक्तांना लेखी निवेदन दिले.

त्यावर आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या प्रभारींना फोन करून महाराजांच्या पुतळ्याची सफाई नियमित करण्याचे निर्देश दिले. तसेच या पुढे देखभाल, सुरक्षितता, सणासुदीला सजावट केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती पोपळे यांनी दिली.

युतीची सत्ता असूनही ही परिस्थितीमीरा-भाईंदर पालिकेत युतीची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांच्या दालनांवर कोट्यवधींचा खर्च केला जात असताना पुतळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभाराच्या नावाने बोटे मोडली आहेत. अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMNSमनसे