ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग

By रणजीत इंगळे | Updated: September 10, 2025 02:16 IST2025-09-10T02:16:15+5:302025-09-10T02:16:52+5:30

 ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ...

If you want to bring power to Thane, you have to burn Ravana's ego Ganesh Naik sounded the trumpet of Thane Municipal Corporation elections | ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग

ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग

 ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. आगामी पालिका निवडणुकीचे अद्याप बिगुल वाजलेले नसताना देखील भाजपने ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिले आहे. त्यातच नाईकांच्या या विधानाने ठाण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का”, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना नाईकांनी डीवचलय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात यूतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असेही नाईक यावेळी म्हणाले. भाजपाच्या सेवा पंधरवडा निमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक बोलत होते.. या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदिप लेले, काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

Web Title: If you want to bring power to Thane, you have to burn Ravana's ego Ganesh Naik sounded the trumpet of Thane Municipal Corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.