शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी न मिळाल्यास सत्तेत घेऊ

By admin | Updated: March 29, 2017 05:26 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे भाजपात इनकमिंग सुरू झाले आहे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे भाजपात इनकमिंग सुरू झाले आहे. नव्याने येणाऱ्यांमुळे निष्ठावंतांनी नाराज होण्याचे कारण नाही. या मंडळींना घेऊन काम करा. नव्याने आलेल्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना सत्तेत सहभागी करून घेऊ, असा सबुरीला सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केला. दानवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेसमधील काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, अशोक तिवारी, परशुराम म्हात्रे, नगरसेविका वत्सला पाटील, वंदना मंगेश पाटील यांनी तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील, मनीषा पिसाळ, रेखा विरोणी, नगरसेवक हंसुकुमार पांडे, शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन म्हात्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दानवे बोलत होते.राज्यातील २१० जिल्हा परिषदा, २५ नगरपालिका, १० महापालिका भाजपाच्या ताब्यात आल्याने भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना सामावून घेण्याची ताकद एकट्या भाजपाचीच असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ पदासाठी काम करू नये. पालिका निवडणुकीत भाजपाच्याच सत्तेचा अंदाज येत असल्याने इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत आहेत. जेवढ्या निवडणुका आपण जिंकलो तेवढ्या निवडणुका काँग्रेसचे नेते राहुल गांधी हरल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी आ. नरेंद्र मेहता यांनी पालिका निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा केला. (प्रतिनिधी)निष्ठावंत व्हाटस्अ‍ॅप ग्रूपमधून बाहेर : राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत गेलेल्या निष्ठावंतांशी माजी आमदार गिल्बर्ट मेडोन्सा सतत संपर्कात होते. त्यामुळे शक्तीप्रदर्शनासाठी सोबत गेलेले पुन्हा पक्षातच राहणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या व्हाटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये समावेश असलेल्या गयारामांना निष्ठावंतांनी गद्दार ठरवून त्यांना ग्रूपमधून बाहेर काढले. हसनाळे-शिंदे राष्ट्रवादीतच‘लोकमत’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना हसनाळे-शिंदे यांना पक्षाच्या नेतृत्वाने महत्त्वाच्या पदावर संधी दिल्याची आठवण करुन दिली होती. तसेच गटनेते बर्नड डिमेलो यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यांनी पक्षांतराचा विचार सोडून राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी शिंदे यांच्याशी सतत साधलेल्या संपर्काला तिलांजली मिळाली. तसेच शिवसेनेनंतर भाजपाच्या संपर्कात असलेले नगरसेवक रवींद्र माळी यांनीही भाजपातील प्रवेशाला बगल दिली. मात्र ते शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात आहे.