शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
2
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
3
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
4
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
5
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
6
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
7
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
8
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
9
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
10
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
11
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
12
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
13
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
14
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
15
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
16
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
17
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
18
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
19
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
20
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांकडे फाईल गेली की जास्त दिवस थांबते!, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 05:56 IST

विद्यापीठातही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करू; परंतु त्याची फाईल मंजुरीकरिता राज्यपालांकडे पाठवावी लागेल.

ठाणे :  

विद्यापीठातही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करू; परंतु त्याची फाईल मंजुरीकरिता राज्यपालांकडे पाठवावी लागेल. राज्यपालाकंडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते, असा आमचा अनुभव असल्याची कोपरखळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा नामोल्लेख न करता मारली.

प्रस्तावाची फाईल मंजूर करण्यासाठी वेळ पडल्यास मधू मंगेश कर्णिक यांना घेऊन जाऊ; किमान त्यामुळे तरी फाईल लवकर मंजूर होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. अ. भा. साहित्य, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता होणाऱ्या निवडणुका, वाद यांमुळे तीन महिने अगोदरच या अध्यक्षपदाचा मान संपतो, असा टोला सामंत यांनी साहित्यिकांना लगावला.कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्यातर्फे डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित दुसऱ्या युवा साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे  म्हणून सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, कोमसपचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के उपस्थित होते. सामंत म्हणाले की, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडायचे झाल्यास तीन-तीन महिने खलबते चालतात. कोण अध्यक्ष होणार, त्याचा कार्यकाळ काय, किती पुस्तके लिहिली, याची चर्चा होते. परंतु युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात आली. हे चांगल्याचे लक्षण आहे. युवा साहित्य संमेलनाने पाडलेला पायंडा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने आचरणात आणावा, असे सामंत म्हणाले. साहित्यामध्ये किंवा साहित्यिकांमध्ये निवडणूक कसली करायची? निवडणूक आम्ही राजकीय नेते लढवतो ते बस्स आहे. साहित्य, नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेताना वाद होत असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान हा तीन महिने आधीच संपतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढील युवा साहित्य संमेलन रत्नागिरीला करुया, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जिल्ह्याच्या स्तरावर तेथील प्रत्येक कलाकारांची, साहित्यिकांची स्मारके तयार झाली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. यापुढील परीक्षा ऑफलाइनमहाराष्ट्रातील विद्यार्थी कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत. ज्यावेळेस संकट होते, त्यावेळी ऑनलाइन परीक्षा घेतल्या, वेळप्रसंगी रद्दही केल्या; परंतु प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा संवाद झाला पाहिजे. शिक्षण जर ऑनलाइन झाले तर त्याचे तीनतेरा वाजू शकतात. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेणे हेच योग्य असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.राजकारण्यांचे कवी संमेलन घ्यासाहित्य संमेलनात एकदा राजकारण्यांचे कवी संमेलन घ्या, अशी विनंती सामंत यांनी केली. त्याचे अध्यक्ष कोण असतील, हे तुम्हाला माहिती आहे, असे सामंत बोलताच सभागृहात हशा पिकला. मी कोणाचेही नाव  घेतले नाही, कुणाचे नाव घेऊन कुठे माझी चौकट छापून येईल, असे मी काही करत नसल्याची कोपरखळी  त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांना लगावली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्त्रियांच्या बाबतीत भारताइतकी वाईट स्थिती कोणत्याही देशात नसल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर स्त्री सक्षम होणे दूर राहिले. तिच्या संरक्षणाचा मुद्दादेखील सुटू शकला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी