शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

...तर मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी चाळे करणाऱ्यावर कडक कारवाई झाली असती

By जितेंद्र कालेकर | Updated: October 8, 2018 22:57 IST

चिमुकलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रॉय ज्या मोबाईल क्लिपींगमध्ये कैद झाला, ती क्लिपींग पोलिसांकडे आधी दाखविली जाणे आवश्यक होते. तसे झाले असते त्याच्यावर कडक कारवाई करता आली असती, असा दावा आता पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्दे‘ती’ क्लिपींग आधी पोलिसांकडे आलीच नाहीश्रीनगर पोलिसांचा दावा४ आॅक्टोंबरला झाली किरकोळ कारवाई

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रामलखन रॉय (५२) हा ज्या मोबाईल क्लिपिंगमध्ये कैद झाला, ती क्लिपिंग आधी पोलिसांना दाखविणे आवश्यक होते. तसे झाले असते तर त्याच्यावर त्याचवेळी कडक कारवाई करता आली असती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जगदीश याने ४ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वा. च्या सुमारास रतनभाई कंपाऊडच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीशी मद्यधुंद अवस्थेत लैंगिक चाळे केले. हे चाळे करण्यापूर्वी तो त्याचे गुप्तांग बाहेर काढून विचित्र चाळे करीत होता. हा प्रकार तिथे मंडपाचे काम करणाºया अरविंद चौगुले याच्यासह काही मुलांना दिसला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका अडीच वर्षीय मुलीशी तो अश्लील चाळे करु लागला. इथपर्यंत या क्लिपींगमध्ये दिसते. त्यानंतर तो आणखीही काही करण्याच्या इराद्याने त्या मुलीच्या समोर उभा राहिला त्यावेळी या मुलांनी त्याला पकडून श्रीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, मोबाईलमधील ही क्लिपिंग पोलिसांना दाखविण्यात आलीच नाही. केवळ तो एका अडीच ते तीन वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करीत होता, अशी तक्रार त्याला घेऊन येणाºयांनी दिली. प्रत्यक्षात फिर्याद दाखल करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाय, त्यावेळी ही मुलगी किंवा तिचे आई वडील हेही कोणाला माहित नव्हते. तरीही पोलिसांनी त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यापोटी त्याच्याकडून १२०० रुपये अनामत रक्कमही घेतली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले....................हीच क्लिपिंग या मुलांनी मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना दाखविल्यानंतर रॉयचा शोध घेऊन मनसैनिकांनी प्रसारमाध्यमांसमोर सोमवारी हजर करीत त्याची यथेच्छ धुलाई केली........................पोलिसांनी घेतला शोधचार दिवसांनी पुन्हा त्याच आरोपीला व्हीडीओ क्लिपींगसह मनसेच्या सैनिकांनी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या मुलीचा आणि तिच्या आई वडीलांचा शोध घेण्यात आला. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिने हा प्रकार घरात सांगितलाच नाही. असा काहीतरी व्हीडीओ व्हायरल झाल्याचे पोलिसांनीच सांगितल्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार विनयभंग, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) आणि बलात्कार अशा कलमान्वये गुन्हा दाखल करुन रॉयला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी दिली. त्याने आणखीही असे काही प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग