शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बालरंगभूमीमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार झालो - दिलीप प्रभावळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:49 PM

दिलीप प्रभावळकर यांची गांधार गौरव सोहळ्यात मुलखात आयोजित केली होती. यावेळी त्यांनी त्यांचा अभिनयाचा प्रवास उलगडला. 

ठळक मुद्देबालरंगभूमीमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार झालो - दिलीप प्रभावळकर गंधार  कलासंस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण सोहळा दिलीप प्रभावळकर यांची गांधार गौरव सोहळ्यात मुलखात

ठाणे“मी प्रौढ असलो तरी बालनाट्यामध्ये केलेल्या कामांमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार  झालो” असे उदगार ज्येष्ट नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काढले. बालनाट्यातील अजोड कामगिरीबद्दलचा गंधार गौरव पुरस्कार यंदा दिलीप प्रभावळकर याना जाहीर झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना घेतलेल्या मुलाखतीत त्यानी बालनाट्यभूमीचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. नाट्य अभिनेत्री संपदा कुलकर्णी यानी त्यांची मुलाखत घेतली.

ठाण्यातील गंधार  कलासंस्थेतर्फे बालरंगभूमीवरील कलाकार, नेपत्थकार, वेषभुषाकार, प्रकाश योजना अशा विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता.  व्यावसायिक बालनाट्यांसाठी अशा प्रकारचा प्रथमच पुरस्कार देण्यात येत होता. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकर्मी कलाकार दिलीप प्रभावळकर याना या वर्षीच्या "  गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिडशेहून अधिक बालकलाकारांनी मराठी चित्रपट गीतांचा आजवरचा इतिहास रंगमंचावर कलाअभिनयाने जिवंत केला. त्याला रसिकांची चांगली दाद मिळाली. सत्कार सोहळ्याला प्रतिभा मतकरी, ज्येष्ठ पत्रकार  डॉ. उदय निरगुडकर, आमदार संजय केळकर, ठामपा सभागृह नेते नरेश मस्के,दिग्दर्शक विजू माने , लीना भागवत, प्रा. प्रदीप ढवळ, अशोक बागवे, कलाकार विजय गोखले, गंधार कलासंस्थेचे संस्थापक प्रा. मंदार टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते. मुलाखतीत बोलताना दिलीप प्रभावळकर यानी बालनाट्याचा आपल्या जीवनात मोठा वाटा असल्याचे सांगितले. याच ठिकाणी मला उत्कृष्ट अभिनयाचे धडे मिळाले. बालरंगभूमी हि एक प्रयोगशाळा आहे. येथे कलाकारांमध्ये चागल्या अभिनयाची बीजे रोवली जातात असे मला आढळून आले. बालरंगभूमीवर काम करत असताना कशा प्रकारे आवाज फेकणे, संवाद बोलणे, तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची नस या ठिकाणी सापडली. रत्नाकरींच्या बालनाट्यातून  अभिनय करतं असताना बरच काही शिकलो. माझ्या आजवरच्या अभिनयातील प्रवासात बालरंगभूमीचा  सर्वात मोठा वाटा असल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले. गंधार कलासंस्थेबद्दल ऐकले होते पण, आज प्रत्यक्षात पाहावयास मिळाले असे सांगून उपस्थित बालकलाकारांना सल्ला देताना ते म्हणाले की, उत्कृष्ट नट होण्यासही व्यक्तिमत्व देखणे असणे गरजेचे आहे असे नाही. तुमच्या स्वतःतील पैलू ओळखणे गरजेचे आहे. अभिनय करताना स्वत:मधील शक्ती , गुण आणि अभिनयाच्या मर्यादा पाळणे फार महत्वाचे आहे. बालकलाकारांच्या पालकांना सल्ला देताना प्रभावळकर म्हणाले की, तुमच्या आशा - आकांक्षा मुलांवर  लादू नका. त्यांना उमलायला वेळ द्यावा . रियालिटी शो सारख्या शर्यतीपासून दूर ठेवा. मी अनेक प्रकारच्या भूमिका, व्यक्तिरेखा केल्या. मानसिक संतुलन बिघडलेल्या भूमिका केल्या पण, मी भूमिका जगत नाही तर ती फक्त मनापासून तयारी करून करत असतो. त्यामुळेच मला विविध पूरस्कार मिळाले. आज मला गंधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.. असेच अनेक कलाकार बालरंगभीतून उदयाला येवो हि सदिच्छा त्यानी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रDilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर