शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

हुश्शssss ... आमदार तर एकदाचे झाले ! गंगेत घोडे न्हाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:43 IST

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले

सुरेश लोखंडे 

ठाणे : विजयश्री प्राप्त करुनही सत्ता संघर्षाच्या वादात नेमकाच आमदार पदाचा शपथ विधी महिन्या भरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे 'जनात जनार्दनानं निवडलं... आमदार परी नाही' या मथळ्याखालील वृत्तात लोकमतने 21 नोव्हेंबरला उघड केले होते. त्यास अनुसरुन अखेर प्राधान्य क्रमाने बुधवारी राज्यातील 288 विजयी उमेदवारांसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील 24 जणांच्या आमदारकीचा शपथ विधी पार पडला आणि गंगेत घोडे न्हाले...' हुश: ! झाले एकदाचे आमदार आणि सत्ता स्थापनेचा पेच ही दूर' अशी  एकच चर्चा  दिवसभर जिल्ह्यात ऐकायला मिळाली. 

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले आणि त्यानुसार सर्वांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ आज देऊन 'आमदारकी' बहाल केली.  एक महिन्यापासून 'आमदार' या लोक प्रतिनिधीत्वाचा पेच ही आता दूर झाला . आता या नवनिर्वाचित आमदारांना राजशिष्टाचाराचा 'सलाम' ही प्रशासनाला प्राधान्य क्रमाने घालावाच लागेल, आमदारांच्या हक्कांची व सन्मानाची पायमल्ली होणार नाही यांची काटेकोरपणे दक्षता घ्यावी लागेल. त्यांच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनांची अंमलबजावणी देखील करावीच लागेल यात आता दुमत नाही. 

निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा पेच निर्माण झाला आणि या सत्ता संघर्षात 13 व्या विधानसभेच्या सभागृहाची मुदत संपली होतीआणि ते बरखास्त झाले होते. राज्यपालांच्या निमंत्रणानंतर एकाही पक्षाला बहुमत देता आले नव्हते. यामुळे 14 व्या विधानसभेच्या  सदस्यत्वाची एकाही विजयी उमेदवारास शपथ घेता आली नाही . याच दरम्यान  राष्ट्रपती शासन ही लागू झाले. या राजवटीत 'शपथ' अभावी विजयी उमेदवारास प्रशासनांच्या आमदारकीच्या राज शिष्टाचारपासून वंचित राहावे लागले. त्यांना द्याव्या लागणाऱ्या शासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रणाची सक्ती प्रशासनावर नव्हती. इच्छा असून शेतकर्‍यांची बाजू अवकाळी पावसाच्या  संकटात मांडता आली नाही.  तब्बल आजपर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीनंतर विजयी उमेदवारांना वन बाय वन शपथ घेण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आता, आमदारकी पाठोपाठ आता सत्ता स्थापनेचा तिडा ही सुटल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार