पती पत्नीचा वाद सोडविणाऱ्यावर चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:32 IST2020-12-15T19:30:53+5:302020-12-15T19:32:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पती पत्नीचा वाद सोडविणाºया दीपक रेवणकर (२६, रा. दौलतनगर, कोपरी, ठाणे ) याच्यावर हेमंत ...

Husband stabs on man who interfered dispute | पती पत्नीचा वाद सोडविणाऱ्यावर चाकूने हल्ला

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पती पत्नीचा वाद सोडविणाºया दीपक रेवणकर (२६, रा. दौलतनगर, कोपरी, ठाणे) याच्यावर हेमंत रोकडे याने त्याच्या कपाळावर चाकूने वार केल्याची घटना नुकतीच कोपरी येथे घडली. याप्रकरणी हेमंत याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरीतील मच्छी मार्केट समोरील रस्त्यावर ११ डिसेंबर २०२० रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास हेमंत रोकडे याने त्याची पत्नी दीपाली हिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यावेळी त्याच भागात राहणाºया दीपक याने या भांडणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचाच राग आल्याने हेमंत याने त्याच्याकडील चाकूने दीपकच्या कपाळावर डाव्या बाजूला वार केला. यात गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Husband stabs on man who interfered dispute