पत्नीचे हातपाय बांधून चिरला गळा, अनैतिक संबंध असल्याच्या संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:31 IST2019-09-03T14:31:09+5:302019-09-03T14:31:21+5:30
विक्रमचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पत्नीचे हातपाय बांधून चिरला गळा, अनैतिक संबंध असल्याच्या संशय
कल्याण : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करून पसार झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील वसंत चाळीत राहणाऱ्या विक्रम कुमार आणि त्याची पत्नी रेखा या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
विक्रम घरी नसताना रेखाला भेटायला एक तरुण यायच्या. त्यामुळे पत्नी रेखाचे त्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विक्रमला होता. समजावून सुद्धा सांगितले. मात्र, ऐकत नसल्याने 30 ऑगस्टला विक्रमने गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकीट बुक केली. पण, रेखा गावी जायला तयार नव्हती. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.
त्यानंतर सोमवारी दुपारी रेखाच्या घराचे बंद दार शेजाऱ्यांनी उघडले असता रेखाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान, या घटनेनंतर विक्रम फरार झाला असून त्याच्यावर खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, याप्रकणी अधिक तपास करत विक्रमचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.