चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: April 12, 2023 20:35 IST2023-04-12T20:34:56+5:302023-04-12T20:35:03+5:30
वर्तकनगर पोलिसांची कारवाई: पोलिस कोठडीत रवानगी

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक
ठाणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सत्तार गाजी (४४, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या पतीला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी दिली. त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवाशी सत्तार याने ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याची ३४ वर्षीय पत्नी हिच्याशी घरगुती कारणावरुन भांडण करुन तिला मारहाण करीत तिच्या मानेवर आणि पोटावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करीत गंभीर जखमी करीत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याने उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्नल केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी सत्तार याला पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस. डी. लोटे हे करीत आहेत.