शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात काही जागांवर अडले आघाडीचे घोडे

By admin | Updated: January 13, 2017 06:47 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाल्याने

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाल्याने जागावाटपाची दुसरी बैठक गुरूवारी पार पडली. त्यात शहरातील २० पॅनलवर सकारात्मक चर्चा जरी झाली असली, तरी कळवा- मुंब्रा येथील मैत्रीपूर्ण जागांचा निर्णय गुरूवारी झाला नाही. त्यातच ठाणे शहरातील काही जागांवर घोडे अडल्याने १३ पॅनलची चर्चा शिल्लक आहे. परंतु यावर योग्य तोडगा निघेल, असा विश्वास दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला.कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तिला कॉंग्रेसचे बाळकृष्ण पूर्णेकर, सुभाष कानडे, मनोज ओढे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला आदी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे शहरातील २० पॅनलवर यशस्वी चर्चा झाली असून कोणत्या जागेवर कोणी उभे राहायचे कोणता प्रभाग कोणासाठी अतिशय स्ट्रॉंग समजला जातो, त्यानुसार जागावाटपही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार काही ठिकाणी राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचा एक आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन आणि कॉंग्रेसचे दोन अशा प्रकारचे समीकरण तयार झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे. सुरवातीपासून ज्या मतदारसंघावर घोडे आघाडीचे घोडे अडून होते, त्यावर आजही चर्चा झाली नाही. आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित नसल्याने कळवा, मुंब्य्राची चर्चा शुक्रवारी होईल. (प्रतिनिधी)आघाडी निश्चित आहे. काही जागांचे वाटपही ठरले आहे. येत्या निवडणुकीला आम्ही आघाडीनेच सामोरे जाणार आहोत. - मनोज शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्षआघाडीबाबत सुरूवातीपासून सकारात्मक चर्चा सुरु आहे. ती आता पुढे सरकली आहे. काही जागांचा तिढा सुटणे शिल्लक असून शुक्रवारी त्यावर निर्णय होईल. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष