मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
By नितीन पंडित | Updated: September 27, 2023 17:03 IST2023-09-27T17:03:17+5:302023-09-27T17:03:39+5:30
वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबईच्या दिशेने जाणार मालवाहतूक ट्रक रस्त्यात पलटल्याची घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा जबरदस्त होता की अपघाता नंतर ट्रकच्या पुढील चालकाची कॅबिन ही ट्रक पासून वेगळी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. अपघातग्रस्त ट्रक उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू केले आहेत.या अपघाता मुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मर्गिके वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ऐन गणेशोत्सवात हि वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
माझ्याकडे गणेशदर्शनासाठी मुरबाडहुन कार्यकर्ते आले होते त्यांना माझ्या घरी यायला पाच मिनिटांच्या अंतरावरून यायला तब्बल दीड तास लागला. भिवंडीकरांच्या नशिबी ही वाहतूक कोंडी नेहमीचीच समस्या झाली आहे. गणपती बाप्पाने आमची हि वाहतूक कोंडीची समस्यां कायम संपवावी अशी मागणी आपण गणपती बाप्पांकडे केली आहे अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.