भिवंडीतील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे
By नितीन पंडित | Updated: July 4, 2023 18:40 IST2023-07-04T18:40:42+5:302023-07-04T18:40:57+5:30
भिवंडी शहरातील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत.

भिवंडीतील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे
भिवंडी: भिवंडी शहरातील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्डेमुळे रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही पाईपलाईन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हप्तरित येत असल्याने बृहन्मुंबई मनपा प्रशासनाने त्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी भिवंडीतील नागरिक करीत आहेत.
भिवंडी शहराच्या लगत गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने या गोदामांमध्ये कामासाठी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून प्रवास करत असतो. भिवंडी शहर त्याचबरोबर मानकोली ते अंजुर फाटा व काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांना पर्यायी मार्ग म्हणून प्रवासी भादवड ते ताडाळी- वळ या पाईपलाईन रस्त्याने प्रवास करत असतात मात्र सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाईपलाईन रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.