शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात टायरच्या दुकानाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:23 IST

Thane News: घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला शनिवारी सकाळी आग लागली. हे दुकान तळ अधिक सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे.

ठाणे -  घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला शनिवारी सकाळी आग लागली. हे दुकान तळ अधिक सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे. सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच आतून धूर येण्यास सुरुवात होऊन अचानक आगीने भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मनोज गिरी यांच्या मालकीचे CEAT माजोज नामक टायरचे दुकान असून सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच दुकानातून धूर येण्यास सुरुवात झाली होती हळूहळू धूर वाढून अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल,महानगर गॅसचे अधिकारी आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी, एक फायर इंजिन, एक-रेस्क्यू वाहन, एक-जम्बो वॉटर टँकर आणि एक-जेसीबी पाचारण केले होते. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात असून दुकानात सकाळीच धूर येत असताना अचानक आगीने भीषण रूप धारण केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीत एकाच दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :fireआगPuneपुणे