शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

..तरीही मेहबूब शेख कल्याणमध्ये आले; भाजपचा 'तो' इशारा फुसका ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 10:35 IST

कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमाजवळ आज सायंकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेख हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरात झळले होते.

कल्याण - राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यांना कल्याणमध्ये कार्यक्रमास हजर राहण्याची परवानगी देऊ नये, असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. शेख कल्याणमध्ये आले तर भाजप आंदोलन करणार, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र शेख कल्याणमध्ये आले. त्यांची सभाही चांगल्या प्रकारे झाली. त्यामुळे भाजपचा आंदोलनाचा इशारा फुसका ठरला आहे.

कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमाजवळ आज सायंकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेख हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरात झळले होते. हा कार्यक्रम आज सायंकाळी असल्याने त्याआधी भाजप युवा मोर्चाने पोलीस ठाण्यात पत्र देऊन शेख हे कार्यक्रमास हजर कसे राहू शकतात. त्यांना जामीन मिळाला आहे. ते मेळावा कसे काय घेऊ शकतात असे प्रश्न उपस्थित करीत भाजपने हरकत घेतली. शेख मेळाव्यास हजर राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेख हे रोजगार मेळाव्यास उपस्थित राहिले. त्यावेळी व्यासपीठावरुन अनेक वक्त्यांनी शेख यांची बदनामी केली जात आहे. त्यांच्यावरील आरोप खोटा आहे. तसेच राष्ट्रवादी जिल्हा युवाध्यक्ष सुधीर वंडार पाटील म्हणाले, ज्यांनी शेख यांच्या उपस्थितीस हरकत घेतली. त्यांनी समोर यायला हवे होते. रस्त्यावर उतरायला हवे होते. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी चांगलाच धडा शिकविला असता.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे मेळावे सुरु झाले आहेत. या मेळाव्यात शेख यांनी तरुणांना नगरसेवक पदाचे तिकट दिले जाईल, असे व्यक्तव्य करीत महापालिकेत मागच्या वेळी राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणूकीत २० नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला. पाया वाटा आणि गटारे यांची विकास कामे करण्याऐवजी विविध भरीव कामे केली जाणार आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांना फोन लावून त्यांना समस्या सोडविण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आगामी निवडणूकीत भाजप व मनसे यांची युती होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी शेख यांच्याकडे उपस्थीत केला असता त्यांनी भाजप कोणाशीही युती करु शकतो. त्याचा महाविकास आघाडीला काही एक फरक पडणार नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkalyanकल्याणBJPभाजपाPoliticsराजकारण