शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा कशा चालवायच्या?; संस्थाचालकांसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:01 IST

आरटीईच्या निधीत हात आखडता

- अनिकेत घमंडी डोंबिवली : शिक्षणहक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना राखीव आहेत. मात्र, २०१३ पासून विद्यार्थीनिहाय कागदपत्रे सादर करून एकदाही राज्य सरकारकडून अनुदान मिळालेले नाही. सरकार आखडता हात घेत असल्याने यापुढे शिक्षणहक्क कायद्यानुसार प्रवेश कसे द्यायचे आणि शाळा कशा चालवायच्या, असा पेच निर्माण झाल्याचे शहरातील ओमकार इंटरनॅशनल व विद्यानिकेतन शाळांच्या संस्थाचालकांनी स्पष्ट केले आहे.शाळा चालवण्यासाठी आर्थिक बाजू सांभाळताना संस्थाचालकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने ठरलेल्या निकषांनुसार निधीची पूर्तता करून दिलासा द्यावा, अशी मागणी ओमकार इंटरनॅशनलच्या संचालिका दर्शना सामंत यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, साधारणपणे २०१२-१३ पासून हा कायदा आला. सुरुवातीला पहिली किंवा त्याआधीच्या वर्गांसाठी येणारी मुले ही दहाच्या आत होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या सुविधांचा फारसा ताण येत नव्हता. सात वर्षांमध्ये ही मुले आता आठवीपर्यंत पुढे आल्याने या मुलांची संख्या लक्षात घेता एक वर्ग होतो. त्यामुळे आता ते परवडत नाही. राज्य सरकारने २०१३ पासून आतापर्यंत एकदाही निधी दिलेला नाही. आमच्या संस्थेने सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कागदपत्रांची पूर्तता वेळच्या वेळी केलेली आहे. शिक्षण विभागाला त्याबाबतचा तपशीलही देण्यात आला आहे. आजपर्यंत ओमकार इंटरनॅशनल शाळेचे आरटीई प्रवेशांतर्गत प्रवेश दिल्यानंतर राज्य सरकारकडून येणारे सुमारे ३० लाख रुपये आलेले नाहीत, असे सामंत म्हणाल्या.सध्या या उपक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्यामागे शाळेचा गणवेश, पुस्तक यांच्या खर्चाचा विचार केल्यास सुमारे सहा हजार रुपये पहिलीच्या तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. ‘शिक्षणहक्क’अंतर्गत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने हा खर्च कसा पेलणार, असा सवालही सामंत यांनी केला आहे.विद्यानिकेतनचे संचालक विवेक पंडित म्हणाले की, आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निधी सरकारने दिलेला नाही. तीन वर्षांत एकदाही हा निधी मिळालेला नाही. एकूण प्रवेशांच्या २५ टक्के प्रवेश देण्याचे निकष आहेत. मात्र, केवळ १५ टक्केच प्रवेश झाल्यास अन्य १० टक्के प्रवेश हे सामान्य प्रवेशाप्रमाणे करण्याची संस्थांना मुभा देणे गरजेचे आहे. याचाही राज्य सरकारने विचार करून तोडगा काढणे अत्यावश्यक असल्याचे पंडित यांनी सांगितले.शिक्षणाच्या प्रश्नासाठी आणि त्यातूनही प्रवेशाच्या विषयांसाठी न्यायालयाकडे दाद मागायला लावू नका. शिक्षकांकडे आधीच शिकवण्यासाठी फारसा वेळ नाही. त्यातच तांत्रिक मुद्द्यांमध्ये संस्था अडकत गेल्यास आगामी काळात मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे याची सरकारने वेळीच दखल घेण्याची मागणी त्यांनी केली....तर शाळांचा आर्थिक डोलारा कोसळेल!सरकारने हे धोरण जाहीर केले आहे, तर त्यानुसार ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश दिला गेल्यास तातडीने मान्य केलेला निधी शाळांना देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, शाळांचा आर्थिक डोलारा कोसळून जाईल. त्यामुळे शिक्षणपद्धतीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे याचा शासनाने गांभीर्याने विचार करून शाळांचे आर्थिक नुकसान करू नये, असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक अ‍ॅड. प्रा. प्रवीण मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा