शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

कसा येईल कोरोना नियंत्रणात?, ST डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:01 PM

विश्रांती गृहाची क्षमता २०, दाटीवाटीने राहतात ६० जण, सोशल डिस्टसिंगचा फज्जा आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात, कर्मचाऱ्यांना पगारही नाही

ठळक मुद्देसोशल डिस्टसिंगचा फज्जा आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात, कर्मचाऱ्यांना पगारही नाही

ठाणे -कल्याण एसटी डेपोत आत्तार्पयत १७ वाहक चालक कर्मचा:यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एसटी डेपो प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे ३०० कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. डेपोच्या विश्रंती गृहांची क्षमता २० कर्मचाऱ्यांची असताना त्याठिकाणी ६० कर्मचारी दाटीवाटी राहत आहेत. त्यामुळे डेपोत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कसा काय कोरोना नियंत्रणात येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सगळ्य़ा प्रकारामुळे कर्मचा:यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

डेपोतील कर्मचारी भगवान आवटे यांनी सांगितले की, डेपोतील विश्रमगृहाची क्षमता २० कर्मचा:यांची आहे. त्यात ६० कर्मचारी दाटीवाटीने राहतात. एकमेकांच्या शेजारी विश्रंती घेतात. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता ठेवली जात नाही. आत्तार्पयत १७ कर्मचा:यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कालच आणखीन एका कर्मचा:याला कोरोनाची लागण झाली. आज पुन्हा एका कर्मचा:याला ताप आला आहे. याठिकाणी कर्मचा:यांना सॅनिटायझर, मास्क दिला जात नाही. विश्रंतीगृह निजर्तूकीकरण केले जात नाही. केवळ पांढरी पावडर मारुन स्वच्छता केल्याचे भासविले जात आहे. गेल्या पाच महिन्यापासून कर्मचा:यांचा पगार मिळालेला नाही. कोरोना काळात कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा काय करायचा असा प्रश्न कर्मचारी वर्गापुढे आहे.

कर्मचारी अतुल अहिरे यांनी सांगितले की, डेपोत जवळपास 300 कर्मचारी काम करतात. यापूर्वी ७० पेक्षा जास्त फे:या चालविल्या जात होत्या. कोरोना काळात केवळ सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी बसेस चालविल्या जात होत्या.कोरोना काळात जीवाची पर्वान करता कामगारांनी काम केले. त्यांना कोरोनाकाळातील १२७ दिवसांचा पगार अद्याप दिलेला नाही. काही कर्मचा:यांना पाच महिन्याचा पगार मिळालेला नाही. प्रशासनाकडून केवळ चालढकल केली जात आहे. त्यामुळे कर्मचा:यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड हे आज सुट्टीवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र उपस्तित अधिका:यांनी सांगितले की,  कोरोना काळात मुंबई, ठाणो आणि पालघर डेपोतील कर्मचा:याना कामावर हजर राहण्यास सांगितले होते. त्यापैकी केवळ १८ टक्केच कर्मचारी हजर होते. त्यांना पगार दिला आहे. अन्य कर्मचा:यांचा पगारही वरिष्ठांच्या आदेशानुसार दिला जाईल. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात हे स्पष्ट केले नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणBus Driverबसचालक