भिवंडीतील पडघ्यात वादळ वाऱ्याने घरांचे झाले नुकसान
By नितीन पंडित | Updated: May 30, 2023 17:01 IST2023-05-30T17:00:45+5:302023-05-30T17:01:00+5:30
सुदैवाने या वादळ वाऱ्यात जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे.

भिवंडीतील पडघ्यात वादळ वाऱ्याने घरांचे झाले नुकसान
भिवंडी - तालुक्यातील पडघा परिसरात मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळ वाऱ्याने पडघा बोरीवली परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे आलेल्या वादळ वाऱ्याने पडघा व बोरिवली परिसरातील घरांवरचे छप्पर ,कवले व पत्रे उडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यालगतचे झाडे व इलेक्ट्रिक पोल कोसळल्याने मोठी आणि झाली आहे.
सुदैवाने या वादळ वाऱ्यात जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणेने नागरिकांच्या पडझड झालेल्या घरांचे लवकरात लवकर पंचनामे करून नागरिकांना आर्थिक सहाय्यक मिळवून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.