मुस्लीम धर्मगुरूंच्या निधनाच्या धक्क्याने संतप्त जमावाने फोडले रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 06:58 IST2018-05-31T06:58:34+5:302018-05-31T06:58:34+5:30

ऐन रमजानच्या काळात मीरा रोडमधील मशिदीतच शिया समाजाच्या धर्मगुरूंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना

Housed in an unspeakable mob by the fury of the Muslim pilgrims | मुस्लीम धर्मगुरूंच्या निधनाच्या धक्क्याने संतप्त जमावाने फोडले रुग्णालय

मुस्लीम धर्मगुरूंच्या निधनाच्या धक्क्याने संतप्त जमावाने फोडले रुग्णालय

मीरा रोड : ऐन रमजानच्या काळात मीरा रोडमधील मशिदीतच शिया समाजाच्या धर्मगुरूंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्याचा धक्का बसल्याने संतप्त जमावाने रूग्णालयात तोडफोड केली. नयानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वेळेत उपचार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून जमावाचा गैरसमज दूर करत परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यात आल्याने तणाव आणखी वाढला.
मीरा रोडच्या नयानगरमधील
हैदरी चौकात शिया समाजाची मशीद आहे. रमजान सुरू असल्याने उत्तर प्रदेशहून इमाम सईद एहसान हैदर रिझवी (५२) धार्मिक कार्यासाठी
आले होते. मंगळवारी रात्री अचानक रिझवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लागलीच त्यांना रात्री साडेदहा वाजता जवळच्या वोक्हार्ट रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर प्रकृती असलेल्या रिझवी यांच्यावर डॉक्टरांनी ४० मिनिटे उपचार केले, पण त्याला प्रतिसाद न देता त्यांचे निधन झाले.
ही घटना कळताच त्यांचे नातलग व अन्य रहिवाशांनी आरोप करत रुग्णालयात गोंधळ घालण्यास व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर, रु ग्णालयात तोडफोड सुरू केली. बाहेर असलेल्या वाहनाची काच फोडली.

Web Title: Housed in an unspeakable mob by the fury of the Muslim pilgrims