वीजवाहिनीच्या स्पर्शामुळे घरांना आग; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:12 IST2023-05-23T12:12:51+5:302023-05-23T12:12:59+5:30

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहाेचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एका फायर वाहनाच्या मदतीने एका तासात अथक प्रयत्नांनी आग विझविली.

House fires due to contact with power lines; Four injured | वीजवाहिनीच्या स्पर्शामुळे घरांना आग; चार जखमी

वीजवाहिनीच्या स्पर्शामुळे घरांना आग; चार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंब्रा : येथील शिवाजीनगर भागातील जानकी व्हिला या इमारतीजवळ असलेल्या बाबू पाटील चाळीच्या बाजूला असलेल्या बादशहा इस्लाम आणि फरिदा कुरेशी यांच्या तळ अधिक एक मजली घरांना टाटा पाॅवर कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा सोमवारी दुपारी  स्पर्श झाल्याने आग लागली. यात भाड्याने राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले आहेत. 

अलिमउद्दीन कुरेशी (वय ३५), सलमा सय्यद (३०), अलीना सय्यद (५ ) आणि फातिमा सय्यद (४) अशी जखमींची नावे आहेत. त्यांची छाती आणि चेहरा भाजला आहे. उपचारांसाठी त्यांना  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. आगीत दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घरातील काॅम्प्युटर, लाकडी कपाट, शेगडी, भांडी, पलंग, आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहाेचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एका फायर वाहनाच्या मदतीने एका तासात अथक प्रयत्नांनी आग विझविली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी जखमींना दिलासा दिला. 

 

Web Title: House fires due to contact with power lines; Four injured

टॅग्स :fireआग