शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घरतांचे केडीएमसीतील कमबॅक लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:25 IST

तिघेजण पुन्हा सेवेत : पालिकेतील बैठकीत निलंबन आढावा समितीने घेतला निर्णय

कल्याण : लाचखोरी अथवा अन्य कारणास्तव निलंबित झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर निर्णय घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निलंबन आढावा समितीची बैठक झाली होती. त्यात लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेले मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह ११ जणांचा सेवेत घेण्याचा प्रस्ताव होता. परंतु, यातील तिघांचे निलंबन संपुष्टात आणून, त्यांना सेवेत घेतले आहे. तर, घरत यांच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याआधी राज्य सरकारचा अभिप्राय घेण्याचा निर्णय निलंबन आढावा समितीने घेतला आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ९ सप्टेंबरला मुख्यालयात निलंबन आढावा समितीची बैठक झाली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत समितीकडे ११ जणांचे प्रस्ताव आले होते. यात घरत यांचाही प्रस्ताव समाविष्ट होता. त्यामुळे वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख असलेल्या घरतांच्या प्रस्तावावर समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निलंबन आढावा समितीकडे आलेल्या ११ प्रस्तावांवर त्यावेळी चर्चा झाली होती. त्यातील तिघांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. यात कनिष्ठ अभियंता प्रकाश चौधरी, कनिष्ठ लिपिक श्रीधर रोकडे आणि सुरक्षारक्षक रमेश पौळकर आहेत. मनपाच्या सेवेत त्यांना पुन्हा रुजू करून घेतले गेले आहे. मात्र, उर्वरित आठ जणांच्या प्रस्तावावर समितीने निर्णय घेतलेला नाही.राज्य सरकारच्या अभिप्रायावरच घरत यांचे भवितव्य राहणार अवलंबूनअतिरिक्त आयुक्त असल्याने मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. केडीएमसीला माझ्यावर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भूमिका घरत यांनी घेतली होती. त्यावर केडीएमसीने केलेल्या पत्रव्यवहारावर सरकारने घरत हे पालिकेचेच अधिकारी असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला घरत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.यानंतर घरत हे लाचखोरीच्या प्रकरणात अडकले. यात झालेल्या निलंबन कालावधीला दोन वर्षे उलटली आहेत. परंतु, न्यायालयात महाअभियोग (खटला) चालू झाल्याच्या कालावधीला दोन वर्षे पूर्ण झाली नाहीत.घरत हे सरकारचे की महापालिकेचे, याचा फैसला न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे घरत यांना सेवेत पुन्हा घेण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याआधी राज्य सरकारचा अभिप्राय घेण्याची भूमिका निलंबन आढावा समितीने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका