शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गृहविलीगकरणातील रुग्णांचा कचरा उचलाच जात नाही! महासभेत उघड झाली बाब, प्रशासनाची पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:55 IST

ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता. परंतु त्यांचा हा दावा बुधवारी झालेल्या महासभेत सर्व पक्षीय नगरेसवकांनी फोल ठरविल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांच्या घरातील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यामुळे कचरा गोळा केला जात नसेल तर संबधित संस्थेला बिल का अदा करायचे असा प्रश्न उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. त्यामुळे या  संस्थेचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

 कोरोनापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्मुलन करण्याचे काम मे.मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे.एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थाना ६ महिन्याचा कालावधीसाठी देण्यात आले आहे. यासाठी १ कोटींच्या खर्चाला मान्यता देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थाना अनुक्र मे ५० लाखांच्या कामांचा कार्यादेश देण्यात आला आहे. ठाणो महापालिकेचे कोवीड हॉस्पीटल, कोवीड सेंटर आणि आयसोलेशन सेन्टर्समध्ये निर्माण होणारा कचरा संकलित करून या कच:याचे निर्मुलन करण्याची जबाबदारी मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट या संस्थेवर देण्यात आली आहे . तर अँटीजन सेन्टर्स आणि होम आयसोलेशनमध्ये असणा:यांकडून कचरा संकलित करण्याचे काम एन्व्हायरो व्हीजील या संस्थेला देण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन्ही संस्थाचा १ कोटी ५० लाखांचा वाढीव बिलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर एन्व्हायरो व्हीजील संस्थेच्या कारभारावरच नगरसेवकांकडून टीका करण्यात आली.

शिवसेनेच्या नगरसेविका रु चिता मोरे, नगरसेवक विकास रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी गृह विलीगकरणात असणा:या रुग्णांकडून कचरा उचललाच जात नसल्याची माहिती सभागृहात उघड केली. ठाणो महापालिकेच्या प्रदूषण अधिकारी मनीषा प्रधान यांनी होम आयसोलेशन असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्यासाठी मेडिकलची टीम तसेच एक गाडी प्रभागात फिरत असल्याची माहिती दिली. तसेच या मेडिकल टीम कडून घरी असणा:यांसाठी कचर्यासाठी पिशव्या देखील देण्यात येत असल्याचे संगीतले. मात्र आतापर्यंत होम आयसोलेशन असणा:यांकडून किती कचरा संकलित केला असा सवाल विकास रेपाळे यांनी उपस्थित केल्यानंतर मनीषा प्रधान यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण १२ हजार ७८० किलो कचरा संकलित करण्यात आला असल्याचे प्रधान यांनी सांगितले. मात्र होम आयसोलेशन असणा:यांकडून किती कचरा संकलित केला याची माहिती प्रधान यांना देता आली नाही. तर दुसरीकडे नगरसेवकांकडेच कोणीही फिरकले नाही तर सर्वसमान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित करून हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले.मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे एनव्हायरो व्हीजील या दोन संस्थाचे नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ वाढीव रक्कम अनुक्र मे ४१ लाख १० हजार तसेच १० लाख ६४ असे एकूण ५४ लाख ७५ हजार एवढी वाढीव रक्कम आहे. रु ग्णसंख्या वाढत असल्याने पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत कोविडचा कचरा संकलित करण्यासाठी आणि निर्मुलनासाठी पुढील सहा महिन्याच्या कालावधीसाठी मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे. एनव्हायरो व्हीजील यांनी ७० लाख आणि २५ लाख असे एकूण ९५ लाखांची रक्कम आवश्यक असून त्या अनुषंगाने १ कोर्टी ५० लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव ठाणो महापालिकेने सर्वसाधारण सभेत आणला होता.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या