शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Holi : होळी सणावर कोरोनाचे सावट; धुळवडप्रेमींची निराशा, खडवली भातसा नदीवर शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:06 IST

Holi: दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भातसा नदीवरील पिकनिक स्पॉटवर शुकशुकाट पाह्यला मिळाला. 

- उमेश जाधव

टिटवाळा : हिंदू संस्कृतीतला महत्वाचा समजला जाणारा मोठा सण म्हणजे होळी. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी होता होता पुन्हा नव्याने जास्तीच वाढत चालला आहे. या दुसऱ्या लाटेत ठाणे जिल्ह्यासह कल्याण तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भातसा नदीवरील पिकनिक स्पॉटवर शुकशुकाट पाह्यला मिळाला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून होळी सणांवर काही निर्बंध लादले गेल्याने परिसरात बहुतांशी ठिकाणी शुकशुकाट पाह्यला मिळाला. खडवली येथील निसर्गरम्य वातावरण आणि नदीचे वाहते निळसर स्वच्छ सुंदर पाणी मुबंई उपनगरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. भातसा नदीवर धुळवड खेळून झाल्यानंतर धुळवडीचा रंग काढण्यासाठी हजारोच्या संख्येने धुळवड प्रेमी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता कहर पाहता या ठिकाणी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त या तैनात केला होता. अशाही परिस्थितीत काहीजण नदीकडे फिरकण्याचा  प्रयत्न करत होते. मात्र या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांकडून त्यांना सुचान देऊन परतवून लावण्यात येत होते. हे पहिलेस बर्षे असेल की धुळवडीच्या दिवशी खडवली भातसा नदितीरावर शुकशुकाट दिसून आले.

दुसरीकडे, कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्यावतीनेही काही नियमावली बनवण्यात आली आहे. जर कोणी सोसायटीच्या आवारात होळी अथवा रंग पंचमी साजरी करणार असतील तर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

यंदाच्या होळी उत्सवावर कोरोनाचे विरजण पडल्याने दर वर्षी प्रमाणे यंदाचा होळी उत्सव आसून नसल्यासारखा असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी शासनाचे नियम पाळत कमी गर्दीत होळ्या पेटविण्यात आल्या. तर बच्चे कंपनीने काही प्रमाणात धुळवडीचा आनंद लुटला असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHoliहोळी