भिवंडीत होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा

By नितीन पंडित | Updated: March 7, 2023 17:09 IST2023-03-07T17:09:12+5:302023-03-07T17:09:25+5:30

भिवंडी शहर व ग्रामीण भागात होळी व धुलीवंदन सण सोमवार व मंगळवारी मोठ्याउत्साहात साजरा करण्यात आला .

Holi and Dhulivandan are celebrated with enthusiasm in Bhiwandi | भिवंडीत होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा

भिवंडीत होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा

भिवंडी- भिवंडी शहर व ग्रामीण भागात होळी व धुलीवंदन सण सोमवार व मंगळवारी मोठ्याउत्साहात साजरा करण्यात आला . मंगळवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात लहान मुलांसह नागरिकांनी एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरी केली तर सोमवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

होळी निमित्त वडघर ग्राम पंचायतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लहान मुलांनी या नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या गावातील मुली व जावयांचा सन्मान देखील या निमित्त वडघर ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील शेकडो नागरिक व महिलांनी हजेरी लावली होती.

Web Title: Holi and Dhulivandan are celebrated with enthusiasm in Bhiwandi