शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील रक्तरंजित राजकारणाचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 08:43 IST

ठाणे जिल्हा हा एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे या भागात खूप पूर्वीपासून गुन्हेगारीने अंकुर धरला. शिवाय या जिल्ह्यात राजकीय वादातून राजकीय नेत्यांच्या हत्या, हल्ले हे प्रकार वरचेवर घडले आहेत. त्या काळ्याकुट्ट इतिहासाचा हा पट...

ठाणे जिल्हा हा एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे या भागात खूप पूर्वीपासून गुन्हेगारीने अंकुर धरला. शिवाय या जिल्ह्यात राजकीय वादातून राजकीय नेत्यांच्या हत्या, हल्ले हे प्रकार वरचेवर घडले आहेत. त्या काळ्याकुट्ट इतिहासाचा हा पट...   

 १९८५ : रिक्षा युनियनचे अध्यक्ष विजू नाटेकर यांच्या हत्येने ठाणे ढवळून निघाले १९८९-९० : महापौर निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याने श्रीधर खोपकर याची भर रस्त्यात झाली होती हत्या. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना या प्रकरणात ‘टाडा’खाली अटक झाली होती. १९९० : गवऱ्याभाईची मुंब्र्यात हत्या १९९५ : पिंट्याभाई व अन्य एकाची हत्या २००४ : नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा रवींद्र फाटक यांनी रघुनाथ नगर भागातील शिवसेनेची शाखा ताब्यात घेतली तेव्हा मोठा राडा २००७ :  महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस कोर्ट नाका येथील एका हॉलमध्ये तत्कालीन मनसे नेते शिशिर शिंदे व शिवसेनेचे बाळा राऊत यांच्यात संघर्ष २००९ : राजन किणे व गोपाळ लांडगे यांच्यातील वाद हातघाईवर २०१३ : परिवहन समितीच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्याने विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मतदान केल्याने भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटील यांच्या पालिकेतील कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राडा 

 २०२३ : ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचे बॅनर लावण्यावरून शिवसैनिकांनी डोके फोडले २०२३ : घोडबंदरला ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना पोटात लाथा मारून मारहाण २०२३ : मुंब्र्यातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून गदारोळ

२०२३ : कोपरीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे व शिंदे गटात मोठा राजकीय राडा

कल्याण डोंबिवली२००१ : कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांची हत्या.२००७ :  शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गोळीबार, पण ते बचावले.२०२३ : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला.भिवंडी२०१२ : नगरसेवक सलीम कुरेशी यांनी साथीदारांसह केली समाजसेवकाची हत्या. कुरेशी तुरुंगात.२०१७ : काँग्रेसचे नगरसेवक व सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याच्याकडून हत्या.

उल्हासनगर १९८६ : शिवसेनेचे नेते व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रमाकांत चव्हाण यांचा शहाड फाटक परिसरात खून.  १९८९ : माजी आमदार पप्पू कलानी यांचे काका दुलीचंद कलानी यांचा खून  १९९० : घन:श्याम भतीजा व इंदर भतीजा या दोन भावांचे तीन महिन्यांच्या अंतराने खून १९९२ : रिपाइं नेते व रिक्षा संघटनेचे मारोती जाधव यांचा खून १९९१ ते ९५ : श्याम जाड्या, राजन गुप्ता, लालूमल हेमदेव, नंदू बिल्डर, सुदेश भटिजा, कम्मू दादा यांचे खून. पोलिस अटकेत असलेल्या अण्णा शेट्टी याच्यावर गोळीबार. शेट्टी व दोन शस्त्रधारी पोलिसांचा मृत्यू. २००० : शिवसेनेचे नेते गोपाळ राजवानी यांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खून. (काँग्रेस नेते मोहन बहारानी, सुभाष मनसुलकर व दीपक गाजरिया यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. मात्र ते बचावले.)

अंबरनाथ-बदलापूर २००२ : ठाण्याचे रिपाइं जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाडची हत्या २००९ : नगरसेवकाचा भाचा समीर गोसावीची हत्या २०११ : नगरसेवक नितीन वारिंगेची हत्या  २०११ : शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर हल्ला २०१७ : अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष उमेश गुंजाळ यांची हत्या  २०२० : मनसे पदाधिकारी राकेश पाटील याची हत्या  

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाFiringगोळीबारPoliceपोलिस