हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:06 IST2018-02-20T01:06:10+5:302018-02-20T01:06:13+5:30

मुंबईतील दोन मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन येथे आणणाºया प्रॉडक्शन क्षेत्रातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिता घोसाळकर (३८) असे या महिलेचे नाव आहे.

High profile sex racket revealed | हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट झाले उघड

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट झाले उघड

मीरा रोड : मुंबईतील दोन मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन येथे आणणाºया प्रॉडक्शन क्षेत्रातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिता घोसाळकर (३८) असे या महिलेचे नाव आहे.
अनिता वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरवत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सापळा रचला. बनावट गिºहाइकामार्फत तिच्याशी संपर्क साधला. अनिताने आपल्याकडे नामांकित मॉडेल या वेश्या व्यवसायासाठी असल्याचे सांगत एका मॉडेलचा दर हा सव्वा लाख रुपये असल्याचे सांगितले. पोलिसांना या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची खात्री पटताच गिºहाइकामार्फत त्या मॉडेलची मागणी करण्यात आली. या मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन-धावगी येथील सिल्व्हर डोअर रिसॉर्ट हे ठिकाण निश्चित केले. त्याचवेळी तेथे पोलिसांनी अनिताला पकडण्यासाठी सापळा रचला.

Web Title: High profile sex racket revealed