कंपनीत तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडला, हेल्परचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 16:58 IST2020-07-28T16:58:25+5:302020-07-28T16:58:33+5:30

ओमकार हा कंपनीत सोमवारी तिस-या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करीत होता. हे काम करीत असताना त्याचा तोल गेला,  तिस-या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला.

The helper died after falling off the third floor in the company | कंपनीत तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडला, हेल्परचा मृत्यू

कंपनीत तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडला, हेल्परचा मृत्यू

डोंबिवली: येथील पूर्वेकडील मानपाडा विकासनाका परिसरातील नवजीवन डाईंग कंपनीत हेल्पर म्हणून काम करणा-या ओमकार गुप्ता चा तिस-या मजल्यावरून तोल जावून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ओमकार हा कंपनीत सोमवारी तिस-या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करीत होता. हे काम करीत असताना त्याचा तोल गेला,  तिस-या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला नजीकच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रूग्णालय रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्याच्या मृत्यूची नोंद त्याठिकाणी करण्यात आली. परंतु अपघाताची घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा रामनगर पोलिसांकडून मानपाडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. ओमकारचा भाऊ लवकुश याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान ओमकार तोल जाऊन पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Web Title: The helper died after falling off the third floor in the company